Psalms 72

1हे देवा, तू राजाला आपले न्यायाचे निर्णय,
राजाच्या मुलाला आपले न्यायीपण दे
2तुझ्या लोकांचा नितिने न्याय करो,
आणि तुझ्या गरीब लोकांचा न्यायनिवाडा न्यायाने करो.
3पर्वत लोकांसाठी शांती उत्पन्न करतील;
टेकड्या न्यायीपणा उत्पन्न करतील.

4तो लोकांच्या गरीबातील न्याय करील;

गरजवंताच्या मुलांना तारील
आणि जुलूम करणाऱ्यांचे तुकडे करील.
5जोपर्यंत सूर्य टिकेल आणि चंद्र आहे
तोपर्यंत सर्व पिढ्यानपिढ्या ते तुझा आदर करतील.

6जसा कापलेल्या गवतावर पाऊस पडतो,

तशी पृथ्वीला भिजवणारी पावसाची सर उतरून येईल.
7त्याच्या दिवसात नितिमानाची भरभराट होवो
आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती होईल.

8समुद्रापासून समुद्रापर्यंत

आणि त्या नदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो.
9अरण्यात राहणारे त्याच्यासमोर नमन करोत;
त्याचे शत्रू धूळ चाटोत.
10तार्शीश आणि बेटांचे राजे खंडणी देवोत;
शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणोत.

11खरोखर, सर्व राजे त्याच्यापुढे नमन करोत;

सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत;
12कारण त्याने धावा करणाऱ्या गरजवंताला
आणि गरीबाला दुसरा कोणी मदतनीस नाही त्याला मदत केली आहे.

13तो गरीब आणि गरजवंतांवर दया करील,

आणि गरजवंताचा जीव तो तारील.
14तो त्यांचा जुलूम आणि हिंसाचारापासून त्यांचा जीव खंडून घेईल,
आणि त्यांचे रक्त त्याच्या दृष्टीने मौलवान आहे.

15राजा जगेल, त्याला शबाचे सोने दिले जावो.

लोक त्याच्यासाठी नेहमी प्रार्थना करो;
देव त्याला दिवसभर आशीर्वाद देवो.
16तेथे पृथ्वीत पर्वत कळसावर विपुल धान्य येवो;
तिचे पीक लबानोन झाडासारखे वाऱ्याच्या झुळकेने डुलोत
आणि नगरातले लोक पृथ्वीच्या गवतासारखी भरभराटीस येवो.

17राजाचे नाव सर्वकाळ टिकून राहो;

सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव पुढे चालू राहो;
त्याच्यात लोक आशीर्वादित होतील;
सर्व राष्ट्रे त्याला धन्य म्हणतील.

18परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, धन्यवादित असो,

तोच फक्त आश्चर्यकारक गोष्टी करतो.
19त्याचे गौरवशाली नाव सर्वकाळ धन्यवादित असो
आणि सर्व पृथ्वी त्याच्या गौरवाने भरली जावो. आमेन आणि आमेन.
इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या.
20

Copyright information for MarULB